Advertisements
Advertisements
Questions
सत्त्व उतारा देऊन |
अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण |
शांत केली जनार्दनें ||
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
पुढील काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 60/70 शब्दांत लिहा.
सत्त्व उतारा देऊन | अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण | शांत केली जनार्दनें ||
Solution 1
'विंचू चावला' या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम-क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा, याचा ऊहापोह केला आहे.
संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकूळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल, तर त्यावर सत्त्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्त्वगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्त्वगुणाच्या उताऱ्याने वेदना शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच, तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे.
तमोगुण व सात्त्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरीत्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते.
Solution 2
“भारुड” हा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे, ज्याला एक आध्यात्मिक रूपक मानले जाते. सर्वसामान्य लोकांना नीतीमूल्य शिकवण्यासाठी आणि योग्य आचरणाचे ज्ञान देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. संत एकनाथांचे ‘विंचू चावला’ हे एक नाट्यपूर्ण भारुड यासाठी प्रसिद्ध आहे. या रचनेत विंचू म्हणजे काम, क्रोध यांसारख्या विकारांचे प्रतीक आहे. विंचवाच्या विषामुळे होणाऱ्या असह्य वेदनांप्रमाणेच या विकारांमुळे माणसाचे जीवन अस्थिर होते, आणि तो बेताल किंवा अविचाराने वागतो.
या त्रासांवर उपाय म्हणजे सत्त्वगुणांचा आश्रय घेणे, म्हणजेच चांगले विचार व सद्गुणांचा विकास करणे. तमोगुण, म्हणजे वाईट प्रवृत्ती दूर केल्याने जीवनात शांतता आणि समाधान लाभते. जरी आयुष्यात काही त्रुटी किंवा अडचणी राहिल्या तरी परमेश्वर भक्ती, म्हणजेच जनार्दनाची भक्ती त्या मनातील अस्वस्थता शांत करू शकते आणि अखेरीस सुखाची अनुभूती देते. भारुडाच्या या मनोरंजक रचनेतून साध्या आणि खेळकर रीतीने सात्विकतेचा उपदेश केला जातो, जो माणसाला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो.
Notes
Students can refer to the provided solutions based on their preferred marks.
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.
तम घाम अंगासी आला, म्हणजे -
योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.
मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे -
योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.
सत्त्व उतारा देऊन, म्हणजे-
योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.
‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे -
कृती करा.
कामक्राेधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय
खालील ओळींचा अर्थलिहा.
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां ।।
रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।
अभिव्यक्ती.
तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
अभिव्यक्ती.
‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा:
(१) कामक्रोधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय: (२)
(य) ______
(र) ______
(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा - (२)
(य) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे ______.
(अ) जीवनसत्त्व देऊन
(आ) सत्त्वगुणांना आश्रय घेऊन
(इ) सात्त्विक आहार देऊन
(ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून
(र) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे - ______
(अ) भारूड उत्तम गाता येते.
(आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
(इ) भारुडाला अर्थ प्राप्त होतो.
(ई) भारुड अधिक रंजक बनते.
विंचू चावला वृश्चिक चावला। पंचप्राण व्याकुळ झाला। मनुष्य इंगळी अति दारुण। ह्या विंचवाला उतारा। सत्त्व उतारा देऊन। |
(३) अभिव्यक्ति: (४)
सद्गुण अंगी बाणविण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
मनुष्य इंगळी अति दारुण।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची।
या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
खालील ओळींचा अर्थ लिहा.
ह्या विंचवाला उतारा। सत्त्व उतारा देऊन। |