English

पुढील परिच्छेद लक्षपूर्वक वाचा आणि त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा माणसाखालोखाल मला निसर्ग मला प्रिय आहे. तशाच आवडत्या आहेत माझ्या बालपणाच्या आठवणी. त्यातूनही मला विषय मिळत गेले. माझ्या - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील परिच्छेद लक्षपूर्वक वाचा आणि त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

माणसाखालोखाल मला निसर्ग मला प्रिय आहे. तशाच आवडत्या आहेत माझ्या बालपणाच्या आठवणी. त्यातूनही मला विषय मिळत गेले. माझ्या वाचनाला काही शिस्त नाही. लहानमोठे, बरेवाईट, भव्य-क्षुद्र सारे मला वाचायला आवडते. या वाचनातून काहीतरी अवचित डोळ्यांना दिसते. मनात घुसते आणि हो... माझ्या आवडत्या मांजरांनी तर अनेकदा मला लेखनाला विषय दिले आहेत. राजकारण आणि समाजकारण यात मला फारसा रस नाही त्यामुळे त्या विषयाचा मात्र माझ्या लेखनात अभाव आहे.

माझे बरेचसे ललित लेख वृत्तपत्रांतून सदर चालवताना लिहिले गेले आहेत. वृत्तपत्रात सदर चालवणे ही गोष्ट काही लेखकांना कमीपणाची वाटते. हे लेखन शाश्वत नसते, त्यात फक्त तात्कालिक घटना प्रसंगावरच लिहिले जाते, त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो, जीवनाचा सखोल तळ गाठण्याची त्या लेखनात कुवत नसते, आजचे वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते, हे आणि तसेच कितीतरी आक्षेप वृत्तपत्रातल्या सदरावर घेतले जातात. त्यातल्या काहींमध्ये सत्याचा अंश असू शकेल. तरीही वृत्तपत्रात एखादे सदर नियमितपणे चालवणे, यात लेखकाला कमीपणा आणणारे काही आहे असे मला वाटत नाही. निदान माझा तरी असा अनुभव नाही. वाहत्या प्रवाहात अंग झोकून पाण्यावर तरंगताना पोहणाऱ्याला जो अनुभव मिळतो, तोच आनंद असे मुक्त लेखन सातत्याने करताना मला लाभला आहे. ललितलेख लिहिण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात? पूर्वग्रहरहितता, मनाचे डोळसपण, जीवनाबद्दलचे उदंड कुतूहल आणि कोणत्याही लहानमोठ्या गोष्टींना चटकन प्रतिसाद देणारी संवेदनक्षम वृत्ती यांची या लेखनाला फार आवश्यकता आहे असे मला वाटते. शिवाय लिहिण्याची हौस हवी आणि कष्टाची तयारी हवी. अशा प्रकारच्या लेखनाची पहिली प्रेरणा पैसा मिळवणे ही असेल- नव्हे असतेच. पण तो काही त्याचा शेवट नव्हे. निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराने लाभणारी तृप्ती, इतरांशी संवाद साधण्याची निकड हीच अशा लेखनाची खरी प्रेरणा, खरे पारितोषिक आहे. कवितेच्या खालोखाल ललितलेख हा माझा आवडता वाङ्मयप्रकारआहे. त्याचेही कारण हेच असावे. कारण कविता लिहिताना जे समाधान मला मिळते तीच तृप्ती या ललित लेखनानेही अनेकदा मला दिली आहे.

  1. खालील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून लिहा(3)  
    1. लेखिकेच्या लेखनात कोणत्या विषयाचा अभाव आहे?   
      1. तत्कालिक घटना
      2. राजकारण आणि समाजकारण
      3. निसर्ग
      4. बालपणच्या आठवणी
    2. कोणते लेखन शाश्वत नसते?   
      1. वृत्तपत्रातील सदर
      2. ललित लेख
      3. निसर्गपर लेखन
      4. कविता
    3. 'शाश्वत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे....  
      1. चिरकाल
      2. चिरंतन
      3. चिरायु
      4. क्षणिक
  2. पुढील प्रश्नांची 15/20 शब्दांत उत्तरे लिहा.  (4)      
    1. ललितलेखनासाठी कोणते गुण आवश्यक असतात?   
    2. ललित लेखनाच्या खऱ्या प्रेरणा कोणत्या? 
  3. पुढीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 40/45 शब्दांत लिहा.  (3)
    1. वृत्तपत्रात सदर चालवणे काही लेखकांना कमीपणाचे का वाटते?
Comprehension

Solution

    1. राजकारण आणि समाजकारण
    2. वृत्तपत्रातील सदर
    3. क्षणिक
  1.    
    1. पूर्वग्रहरहितता, मनाचे डोळसपण, जीवनाबद्दलचे उदंड कुतूहल आणि कोणत्याही लहानमोठ्या गोष्टींना चटकन प्रतिसाद देणारी संवेदनक्षम वृत्ती यांची या लेखनाला फार आवश्यकता आहे असे मला वाटते. शिवाय लिहिण्याची हौस हवी आणि कष्टाची तयारी हवी.
    2. निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराने लाभणारी तृप्ती, इतरांशी संवाद साधण्याची निकड.
  2.    
    1. हे लेखन शाश्वत नसते, त्यात फक्त तात्कालिक घटना प्रसंगावरच लिहिले जाते, त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो, जीवनाचा सखोल तळ गाठण्याची त्या लेखनात कुवत नसते, आजचे वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते, हे आणि तसेच कितीतरी आक्षेप वृत्तपत्रातल्या सदरावर घेतले जातात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×