Advertisements
Advertisements
Question
खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.
Solution
लेखकाने दुसऱ्याच दिवशी त्या भिक्षेकऱ्यास दोन शाली दिल्या.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्या वर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, ‘‘तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?’’ मी एका पायावर ‘हो’ म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दि ली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षि णेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या . थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्या च्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ याघटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्य क्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्य क्रमात सन्मा नाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ |
(१) कोण ते लिहा. ०२
- सभा, संमेलने गाजवणारे कवी -
- विश्वकोशाचे अध्यक्ष नात्याने वाईला जाणारे -
- लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे -
- मासे पकडण्याचा उद्योग करणारी -
(२) का ते लिहा. ०२
- बाळ रडत होते कारण....
- लेखकाने सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली कारण....
(३) खालील शब्दासाठी उताऱ्यात आलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
- वर × ______
- उद्धट × ______
- ओहोटी × ______
- कमी × ______
(४) स्वमत - ‘‘शाल व शालीनता पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ०२
पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख - ______
उत्तरे लिहा.
२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - ______
उत्तरे लिहा.
पाठात उल्लेख असणारी नदी - ______
उत्तरे लिहा.
सभासंमेलने गाजवणारे कवी - ______
आकृती पूर्ण करा.
खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. म्हातारा भिक्षेकरी कोठे बसला होता?
२. भिक्षेकर्याने अंगावर व अंगाखाली काय पांघरले होते?
पुढे चार-पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यांनतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे! मी म्हटले, ’बाबा, तुम्ही मला ओळखले?“ त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, ’बाबा, पाच-सहा दिवसांपूर्वी मी तुम्हांला दोन शाली दिल्या होत्या. आठवते?“ यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, ’हे भल्या माणसा, तू लई मोठा! म्यास्नी शाली दिल्या! पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट! मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा! आमचं हे असलं बिकट जिणं! तुझं लई उपकार हायेत बाबा.“ शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब! भुकेल्यास अन्न दयावे, तहानलेल्यास पाणी दयावे आणि हेही जमले नाही, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी दयाव्यात! |
२. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
३. स्वमत कृती (०३)
'पांघरण्यासाठी दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याने विकल्या' त्याची ही कृती तुम्हांस योग्य वाटते, की अयोग्य हे सकारण लिहा.