Advertisements
Advertisements
Question
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
Solution
उल्लेख, मुद्दाम, किल्ला, जिल्हा, झिम्मा, कुत्रा, पुत्र, चित्र, दुर्जन, दिल्ली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हांला कळते.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
रस्ता -
खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.
बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
तुझ्याजवळ -
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आईचा स्वयंपाक झाला होता.
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
ऑपरेशन -
जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
ऊन × ______
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
तू जेवण केलेस का
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ पुस्तक वाचतो.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
लहान × ______
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
खालील शब्दाचे लिंग ओळखा.
मेळा - ______
खालील ओळी वाचा.
ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा।
दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी।।
उपमेय - ______
उपमान - ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.