Advertisements
Advertisements
Question
खालील संक्षिप्त टिप लिहा:
संमिश्र भूमी उपयोजन.
Short Note
Solution 1
काही शहरी भागांमध्ये संमिश्र भूमी उपयोजन आढळून येतो.
- ही अशी क्षेत्रे असतात जिथे विविध प्रकारचे भूमी उपयोजन एकत्र अस्तित्वात असतात.
- काही शहरांमध्ये निवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि प्रशासकीय कार्ये एकात्मिक स्वरूपात आढळतात.
- विकसनशील देशांतील अनेक शहरांमध्ये शाळा, दवाखाने, घरे आणि व्यावसायिक दुकाने एकाच ठिकाणी आढळतात.
- सामान्यतः संमिश्र भूमी उपयोजन वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आढळतो कारण शहरातील जमीन काही विशिष्ट प्रकारच्या वापरासाठी राखीव ठेवण्यास अपुरी असते, त्यामुळे संमिश्र भूमी उपयोजन तयार होतो.
- संमिश्र भूमी उपयोजन क्षेत्रांमध्ये सामाजिक संवादास चालना मिळते, कारण लोक एकाच ठिकाणी राहतात, काम करतात आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात, ज्यामुळे शहरे अधिक सजीव आणि गतिशील बनतात.
- जेव्हा घरे, कार्यालये आणि व्यवसाय जवळ असतात, तेव्हा लोक खासगी वाहनांऐवजी पायदळ किंवा सार्वजनिक वाहतूक वापरू शकतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होते.
- अशा प्रकारे, संमिश्र भूमी उपयोजन शहरी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि जागेचा कार्यक्षम वापर, आर्थिक वाढ आणि शाश्वतता सुनिश्चित करतो.
shaalaa.com
Solution 2
- नागरी क्षेत्रात भूमी उपयोजनाचा एक विशिष्ट कल दिसून येतो. त्यानुसार नगरांमधील किंवा शहरांमधील ठरावीक क्षेत्र हे निवासी बांधकामाखाली, ठरावीक क्षेत्रही उद्योगांसाठी, वाहतूक सेवांसाठी, उदयानांसाठी आणि मनोरंजनाच्या साधनांसाठी वापरले जाते.
- मात्र, काळाच्या ओघात जशी शहराची वाढ होत जाते, तशी शहरातील किंवा नगरातील जमीन वरील विशिष्ट कारणांसाठी वापरली जाते असे नाही. तेथे राहणाऱ्या लोकांच्या सोयीने एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उदयोग, व्यवसाय आणि निवासाची सोय केली जाते.
- त्यामुळे मिश्र भूमी उपयोजन दिसून येते. अशा प्रदेशात निवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, औदयोगिक क्षेत्र, दुकाने, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये अशा विविध गोष्टी एकमेकांजवळ आढळून येतात. त्याला संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात.
- असे संमिश्र भूमी उपयोजन हे प्रामुख्याने शहरांच्या अलीकडे झालेल्या वाढीच्या क्षेत्रात दिसून येते.
shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - नागरी भूमी उपयोजन
Is there an error in this question or solution?