Advertisements
Advertisements
Question
ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा.
Solution
ग्रामीण वसाहतींची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
(१) ग्रामीण वसाहतींच्या स्थानांवर आणि विकासावर भूरचना, मृदा, हवामान, पाण्याची उपलब्धता यांचा प्रभाव पडताना दिसतो.
(२) यामुळे ग्रामीण वसाहती विशिष्ट स्थानावर वसलेल्या दिसतात. त्यानुसार त्यांना पाणवठ्यावरील वस्ती, मैदानी प्रदेशातील वस्ती, डोंगर पायथ्यावरील वस्ती, डोंगर माथ्यावरील वसाहत किंवा रस्त्यांच्या कडेने वाढलेली ग्रामीण वसाहत असे म्हटले जाते.
(३) ग्रामीण वस्त्यांमध्ये नदी, पर्वत, विहिरी, शेते, वने असा नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव जास्त असतो.
(४) ग्रामीण व्यवसायात शेती व उदयोग, पशुपालन, खाणकाम, मासेमारी असे प्राथमिक व्यवसाय प्रामुख्याने आढळतात.
(५) ग्रामीण वस्त्यांची लोकसंख्याही कमी असते, शिवाय तेथील लोकसंख्या घनता ही १०० पेक्षा कमी असते.
(६) बहुतांशी ग्रामीण वस्त्या या विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. अशा वस्त्या या प्रामुख्याने सुपीक मृदा असलेल्या नदी-खोऱ्यांच्या मैदानी प्रदेशात आढळतात.
(७) काही ग्रामीण वस्त्या मात्र केंद्रित स्वरूपाच्या आहेत. पाण्याचा तुटवडा असनार्या वाळवंटी किंवा निमवाळवंटी क्षेत्रात विहिरी किंवा तलावाच्या भोवती केंद्रित स्वरूपाची ग्रामीण वस्ती निर्माण होते.
(८) ग्रामीण वसाहतींचे भूमी उपयोजनही वैशिष्ट्यपूर्ण असते. बहुतांश ग्रामीण वसाहतीत शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे भूमी उपयोजनावर शेतीक्षेत्राचा जास्त प्रभाव दिसतो.
(९) मात्र त्याच वेळेस ग्रामीण वसाहतीतील भूमी आच्छादन हे मात्र नैसर्गिक पर्यावरणाशी सुसंगत असते. त्यामुळेच ग्रामीण वसाहतीतील भूमी उपयोजन जरी कृषिआधारित असले, तरी भूमी आच्छादन हे प्रामुख्याने वनक्षेत्र, गायरान किंवा चराऊ कुरणे, मोकळी जागा, पडीक किंवा नापीक जमीन, जलक्षेत्र यांनी व्यापलेले असते.