Advertisements
Advertisements
Question
वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा.
Solution
वस्त्यांचे प्रत्यक्ष आकार आणि त्यांचे दृश्यस्वरूप व रचना यांच्या आधारे वस्त्यांचे प्रत्यक्ष दृश्यस्वरूप म्हणजे वस्त्यांचे आकृतिबंध होय.
वस्तीच्या स्थानावर अति सुरुवातीस विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव जास्त असतो आणि त्यामुळेच पर्वत पायथा, पाण्याची उपलब्धता, कृषिक्षेत्र, नदी खोऱ्यातील सपाट जमीन, सागर किनारी क्षेत्र अशाच स्थानांचा वापर वस्तीचा विकासासाठी केला जातो. मात्र एकदा वस्ती झाल्यानंतर त्या अवस्थेतील लोकसंख्या विविध व्यवसायांमध्ये कार्यरत होते. अशा आर्थिक व्यवसायांच्या काही स्वतंत्र गरजा असतात आणि त्यामुळेच शहरांच्या पुढील वाढीवर विविध घटकांचा प्रभाव पडतो आणि हळूहळू शहर किंवा ग्रामीण वसाहतीचा एक स्वतंत्र आकृतिबंध तयार होतो. अशा प्रकारचे आकृतिबंध तयार होण्यामागे विविध घटक कारणीभूत ठरतात आणि त्यानुसार विविध आकृतिबंध आणि त्यावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहेत :
(१) रेषीय आकृतिबंध: नदीच्या प्रवाहानुसार नदीच्या काठाकाठाने जेव्हा वस्ती वाढते, तेव्हा काळाच्या ओघात त्या वस्तीला एक रेषीय आकृतिबंध प्राप्त होतो. जेव्हा नागरी वसाहत एखादया प्रमुख वाहतूक मार्गानुसार म्हणजे रस्ते किंवा रेल्वे मार्गानुसार वाढत जाते, तेव्हा अशाच प्रकारचा रेषीय आकृतिबंध नागरी वसाहतीनाही प्राप्त होतो.
(२) वर्तुळाकार आकृतिबंध: एखाद्या तलावाकाठी वस्तीची वाढ झाल्यास ती वर्तुळाकार स्वरूपात वाढते. ग्रामीण वस्त्या विहीर किंवा तलावाभोवती वर्तुळाकार स्वरूपात वाढल्याचे दिसून येते. काही नागरी वस्त्या या स्थानिक राजाचा राजवाडा किंवा एखादे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ उदा., मंदिर याभोवती वाढल्या, तर त्या नागरी वस्तीनाही वर्तुळाकार आकृतिबंध प्राप्त होतो.
(३) केंद्रोत्सारी आकृतिबंध: एका प्रमुख केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो आणि वस्त्यांमधील सर्व वाहतूक मार्ग या केंद्रापासून सुरुवात होऊन बाह्य भागात विकसित होतात. अशावेळी जेव्हा वस्ती वाढते, तेव्हा त्या वस्तीचा आकृतिबंध हा केंद्रोत्सारी स्वरूपात दिसून येतो.
(४) त्रिकोणी आकृतिबंध: दोन नद्यांचा संगम किंवा दोन प्रमुख महामार्ग आणि रेल्वेमार्ग जेथे एकत्र येतात, अशा ठिकाणी जेव्हा वस्ती वाढते, तेव्हा ती वस्ती या दोन नदयांचा संगम किंवा महामार्गाच्या एकत्र येण्याच्या मधल्या भागात त्रिकोणी स्वरूपात वाटते आणि वस्तीला त्रिकोणी आकृतिबंध प्राप्त होतो.
(५) आयताकृती आकृतिबंध: आधुनिक काळातील नियोजित वस्त्यांची निर्मिती ही उभ्या आणि आडव्या अशा एकमेकांना समांतर जाणाऱ्या वाहतूक मार्गांना अनुषंगून केली जाते. घरे एका ओळीत आणि सरळ रेषेत असतात. सर्व वाहतूक मार्ग हे एकमेकांना समांतर असतात आणि अशावेळी जेव्हा वस्तीची वाढ होते, तेव्हा त्या वस्तीस पुढे आयताकृती आकृतिबंध प्राप्त होतो.
(६) आकारहीन आकृतिबंध: वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या भविष्यकालीन वाढीवर जेव्हा कुठल्याही एका ठरावीक घटकांचा प्रभाव न पडता वस्ती वाढत जाते आणि वस्तीपण नियमित स्वरूपात वाढते, तेव्हा त्या वस्तीला आकारहीन आकृतिबंध प्राप्त होतो, अशी वस्ती सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार वाढत जाते. औद्योगिक क्रांतीनंतर बहुतांशी महानगरांची वाढ ही आकारहीन आकृतिबंध दर्शवते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
A: वस्तींचे विविध प्रकार असतात.
R: विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो.
A: नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.
R: एका नगराला केवळ एकच कार्य असते.
फरक लिहा.
केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.
सुबक आकृत्या काढून नावे दया.
रेषीय वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
केंद्रोत्सारी वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
केंद्रित वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
विखुरलेली वस्ती