English

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: कथेत 'घटना' हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:  (२)

(य) कथानकाचे प्रयोजन लिहा.

(र) नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा.

         कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपण जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.

         पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती असते.

         कथेला स्थळ-काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्‍त वातावरण असते. वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते.

         कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षांतूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते.

(२) कथाकाराच्या ‘पात्र’ या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा.   (२)

Comprehension

Solution

(१) 

(य) कथानकाचे प्रयोजन कथेतल्या आशयाचा प्रवाह टिकवून ठेवणे आणि तो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हे असते.

(र) कथेत चांगल्या आणि वाईटाचा संघर्ष हा नाट्यमयता निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असतो.

(२)

  1. वास्तवतेची छटा: कथेतली पात्रे वास्तवातील माणसांप्रमाणे असतात, त्यामुळे वाचक त्यांच्याशी सहज जवळीक साधतात.
  2. व्यक्तिमत्त्वाचे चित्रण: पात्रांची वृत्ती, कृती, भावना, विचार, जीवनदृष्टी इत्यादींमधून त्यांची संपूर्ण शब्दरूप प्रतिमा तयार केली जाते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×