Advertisements
Advertisements
Question
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
Solution
काव्यसौंदर्य: शेतकरी स्त्री सरी-वाफ्यांमध्ये कांद्याची रोपे लावताना जणू स्वतःचा जीवच त्या रोपांमध्ये गुंतवते. ती आपल्या काळ्या आईला हिरव्या पिकांच्या रूपाने सजवते आणि गोंदणाच्या नक्षीप्रमाणे शेतभर पिके फुलवते. शेतकरी स्त्री शेतजमिनीत आपले जीवन समर्पित करत हिरव्या स्वप्नांचे साकार करण्याचा प्रयत्न करते. तिचा संसार आणि तिचे जीवन या मातीतच रुजलेले आहे.
भाषासौंदर्य: कवितेतील शेतकरी स्त्री साध्या आणि सोज्वळ भाषेत तिचे मनोगत व्यक्त करते. तिच्या भाषेतून तिचे कष्ट आणि संघर्ष समजून येतात. कवयित्रीने लोकगीतासारखा सैल छंद वापरून अभिव्यक्ती अधिक प्रभावी केली आहे. नादमय शब्दकलेने कविता साकारत जाते, विशेषतः “रोज मातीत नांदल” ही ओळ वाचकाला भावस्पर्शी वाटते. प्रत्ययकारी शब्दरचना शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर उभे करते.
RELATED QUESTIONS
कृती करा.
संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नाही कांदा गं, जीव लावते. | (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. |
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते. | (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. |
(३) हिरवी होऊन, मागं उरते . | (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. |
खालील ओळींचा अर्थलिहा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काव्यसौंदर्य.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
काव्यसौंदर्य.
‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
अभिव्यक्ती.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
अभिव्यक्ती.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
खालील ओळींचा अर्थ लिहा:
सरी-वाफ्यात, कांदं लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते |
‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’
या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)
(य) ______
(र) ______
(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)
(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)
(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)
सरी-वाफ्यात, कांदं लावते फुलं सोन्याची, झेंडू तोडते ऊस लावते, बेणं दाबते उन्हातान्हात, रोज मरते |
(३) अभिव्यक्ती - (४)
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.