English

सरी-वाफ्यात, कांदं लावते बाई लावते नाही कांदं ग, जीव लावते बाई लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते (१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)

(य) ______

(र) ______

(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)

(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)

(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

ऊस लावते, बेणं दाबते
बाई दाबते
नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

(३) अभिव्यक्ती - (४)

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - 

(य) सरी-वाफ्यात कांदे लावते, झेंडूची फुले तोडते.

(र) घरादाराला तोरण बांधणे, उसाचे बेजे मातीत दाबणे.

(२) 

(य) काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

(र) सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते

(३) मी एक गरीब स्त्री शेतकरी आहे. मी एका लहानश्या झोपडीत माझ्या कुटुंबासोबत राहते. मला दोन मुली आहेत. दोघीही तालुक्याच्या ठिकाणी शाळेत जातात. मी शेतात दिवस-रात्र मेहनत करून माझ्या कुटूंबाचे पालन पोषण करते. मी सकाळी लवकर उठते. गाय, बैल यांना चारा देते. सूर्य उगवताच मी शेताकडे निघते. दिवसभर कडक उन्हामध्ये मी शेतात राब-राब राबते. त्यानंतर जेवण करून मी पुन्हा माझ्या कामाला लागते. कितीही ऊन असो, थंडी असो अथवा जोरदार पाऊस मी न थकता माझे काम प्रामाणिकपणे पार पाडते. एवढे परिश्रम करून सुद्धा मला त्याचा मोबदला मिळत नाही. मी चांगल्या शाळेमध्ये माझ्या मुलींना शिक्षण देऊ शकत नाही. शेतातील धान्य विकून थोडे फार पैसे मिळतात त्यावरचं माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

shaalaa.com
रोज मातीत
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

कृती करा.


संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नाही कांदा गं, जीव लावते. (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते. (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.
(३) हिरवी होऊन, मागं उरते . (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

खालील ओळींचा अर्थलिहा.

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते


काव्यसौंदर्य.

‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


काव्यसौंदर्य.

‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


खालील ओळींचे रसग्रहण करा.

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते


अभिव्यक्ती.

शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.


अभिव्यक्ती.

तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.


खालील ओळींचा अर्थ लिहा:

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते

काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते


‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’

या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.


सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×