English

खालील ओळींचे रसग्रहण करा. उन्हातान्हात, रोज मरतेबाई मरतेहिरवी होऊन, मागं उरते बाई उरते खोल विहिरीचं, पाणी शेंदते बाई शेंदतेरोज मातीत, मी ग नांदतेबाई नांदते - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींचे रसग्रहण करा.

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

Long Answer

Solution

आशयसौंदर्य: 'रोज मातीत' या कवितेत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टमय जीवनाचे प्रभावी चित्रण केले आहे. या ओळींमध्ये तिच्या शेतातील अविरत मेहनतीचे भावपूर्ण वर्णन आढळते. शेतात तिचे आयुष्य कसे वाहून जाते आणि तिला किती कठोर श्रम करावे लागतात, हे हृदयस्पर्शी शब्दांत मांडले आहे.

काव्यसौंदर्य: शेतकरी स्त्री आपल्या कुटुंबासाठी शेतात राबते. ती वाफ्यांच्या रांगांमध्ये कांदे लावते, मन घट्ट करून ऊस जमिनीत रुजवते. तिला उन्हाची पर्वा नसते; ती दिवस-रात्र मेहनत करते. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण ती मातीत समर्पित करते, भविष्यातील हिरव्या पिकांचे स्वप्न पाहते. जेव्हा सुगीच्या हंगामात शेत हिरवेगार फुलते, तेव्हा तिच्या मेहनतीचेच फलित प्रकट झालेले असते. ती खोल विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढते आणि पिकांना पाजते. या सर्व प्रयत्नांतून तिचा संसार फुलत जातो आणि ती अखंड मातीत नांदत राहते.

भाषासौंदर्य: या कवितेतील शेतकरी स्त्री आपल्या मनातील भाव अतिशय साध्या आणि सोज्ज्वळ भाषेत व्यक्त करते. तिच्या शब्दांतून ती भोगत असलेल्या कष्टांची प्रचीती येते. कवयित्रीने या कवितेस लोकगीतांसारखा सैल छंद दिला आहे, नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे. 'हिरवे होऊन मागे उरणे', 'रोज मातीत नांदणे' यांसारख्या प्रतिमा हृदय हेलावून टाकतात. कवयित्रीच्या प्रभावी शब्दकळेमुळे शेतकरी स्त्रीचे कठीण जीवन सहजपणे डोळ्यांसमोर उभे राहते आणि तिच्या कष्टांचे प्रत्ययकारी चित्र उलगडत जाते.

shaalaa.com
रोज मातीत
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.02: रोज मातीत - कृती [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1.02 रोज मातीत
कृती | Q (४) | Page 9

RELATED QUESTIONS

कृती करा.


संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नाही कांदा गं, जीव लावते. (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते. (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.
(३) हिरवी होऊन, मागं उरते . (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

खालील ओळींचा अर्थलिहा.

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते


काव्यसौंदर्य.

‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


काव्यसौंदर्य.

‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.


अभिव्यक्ती.

तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.


खालील ओळींचा अर्थ लिहा:

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते

काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते


‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’

या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.


खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)

(य) ______

(र) ______

(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)

(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)

(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

ऊस लावते, बेणं दाबते
बाई दाबते
नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

(३) अभिव्यक्ती - (४)

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.


सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×