Advertisements
Advertisements
Question
खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.
Solution
आधुनिक संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि विकास यांसाठी ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपांतील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जास्रोत सतत वापरले जातात. यातील बहुतेक ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र मिळवली जात असे. यासाठी निरनिराळ्या इंधनांचा वापर केला जातो. जीवाश्म इंधने आणि कोळसा यांचे मर्यादित साठे आहेत. त्यांचा भरपूर प्रमाणात वापर झाल्यामुळे ते साठे नष्ट होत आले आहेत. जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे प्रदूषण आणि हवामानबदल यांसारखे घातक परिणाम होत आहेत अणू ऊर्जा निर्मिती देखील संहारक ठरू शकते. हरित ऊर्जेच्या दिशेने नव्या संशोधनाने जरी क्रांती केली तरी अफाट वाढणाऱ्या मानवी लोकसंख्येच्या गरजेसाठी ऊर्जा पुरी पडत नाही. म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक आणि काटकसरीने ऊर्जेचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दकोडे सोडवा.
- औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन.
- साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे.
- चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र.
- नैसर्गिक वायूमधील ऊर्जा.
- पवन ऊर्जा म्हणजे
हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.
आधुनिक संस्कृतीमध्ये __________ ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.