English

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:

भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

Options

  • सहमत

  • असहमत

MCQ
True or False

Solution

मी दिलेल्या विधानाशी सहमत आहे.

स्पष्टीकरण:

भांडवल बाजाराची भूमिका खालीलप्रमाणे आहेत:

  1. दीर्घकालीन मुदतीची बचत: औद्योगिक संस्‍था आणि सरकारकडून गुंतवणुकीच्या निधीची वाढती मागणी असते. परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोतांची उपलब्‍धता अपुरी असते. भांडवल बाजार सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध विभागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्यास मदत करतो.
  2. समभाग भांडवल पुरवणे: भांडवल बाजार उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करतो. मालमत्‍ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसाय कार्यवाहीसाठी त्‍याचा वापर करता येऊ शकतो.
  3. परिचालन (कार्यवाही) कार्यक्षमता: भांडवली बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करतो.
  4. त्‍वरित मूल्‍यांकन: भांडवल बाजार समान समभाग आणि कर्ज (रोखे, कर्जरोखे) साधनांचे उचित आणि त्‍वरित मूल्‍य निश्चित करण्यास मदत करतो.
  5. समन्वय: भांडवल बाजार वास्‍तव आणि वित्‍तीय क्षेत्र, समभाग आणि कर्जरोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्‍यादींमध्ये एकत्रीकरण करतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×