English

खालील वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीत एका मिठाईच्या दुकानातील विविध वजनांच्या मिठाईची मागणी दिली आहे. त्यावरून वजनाच्या मागणीचे बहुलक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीत एका मिठाईच्या दुकानातील विविध वजनांच्या मिठाईची मागणी दिली आहे. त्यावरून वजनाच्या मागणीचे बहुलक काढा.

मिठाईचे वजन (ग्रॅम) 0 - 250 250 - 500 500 - 750 750 - 1000 1000 - 1250
ग्राहक संख्या 10 60 25 20 15
Sum

Solution

वर्ग
मिठाईचे वजन (ग्रॅम)
वारंवारता
(ग्राहक संख्या)
0 - 250 10 → f0
250 - 500 60 → f1
500 - 750 25 → f2
750 - 1000 20
1000 - 1250 15

येथे सर्वांत जास्त वारंवारता 60 आहे.

∴ 250 - 500 हा बहुलकीय वर्ग आहे.

आता, L = 250, h = 250, f1 = 60, f0 = 10, f2 = 25

∴ बहुलक = `"L" + [(f_1 - f_0)/(2f_1 - f_0 - f_2)]h`

`= 250 + [(60 - 10)/(2(60) - 10 - 25))]250`

`= 250 + (50/(120 - 35))250`

`= 250 + (50/85)250`

`= 250 + 2500/17`

= 250 + 147.06

= 397.06

∴ मिठाईच्या वजनाच्या मागणीचे बहुलक 397.06 ग्रॅम आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 [Page 166]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 | Q 8 | Page 166

RELATED QUESTIONS

एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील (फॅटचे) स्निग्धांशाचे प्रमाण दिले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा.

दुधातील स्निग्धांश (%) 2 - 3 3 - 4 4 - 5 5 - 6 6 - 7
संकलित दूध (लीटर) 30 70 80 60 20

काही कुटुंबांचा मासिक वीजवापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीजवापराचे बहुलक काढा.

वीजवापर (युनिट) 0 - 20 20 - 40 40 - 60 60 - 80 80 - 100 100 - 120
कुटुंबांची संख्या 13 50 70 100 80 17

चहाच्या 100 हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढा.

दूध (लीटर) 1 - 3 3 - 5 5 - 7 7 - 9 9 - 11 11 - 13
हॉटेलांची संख्या 7 5 15 20 35 18

खालील वारंवारता वितरण सारणीत 200 रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे बहुलक काढा.

वय (वर्षे) 5 पेक्षा कमी 5 - 9 10 - 14 15 - 19 20 - 24 25 - 29
रुग्णसंख्या 38 32 50 36 24 20

प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाड 1 - 3 4 - 6 7 - 9 10 - 12
विद्यार्थी संख्या 7 8 6 4

वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.


खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा:

वर्ग
(भरलेले पेट्रोल लीटरमधे)
वारंवारता
(वाहनांची संख्या)
0.5 − 3.5 33
3.5 − 6.5 40
6.5 − 9.5 27
9.5 − 12.5 18
12.5 − 15.5 12

कृती:

दिलेल्या सारणीवरून,

बहुलकीय वर्ग = `square`

∴ बहुलक = `square + [(f_1-f_0)/(2f_1-f_0 - square)]xxh`

∴ बहुलक = `3.5 + [(40-33)/(2(40)-33-27)]xx square`

∴ बहुलक = `3.5 + [7/(80 - 60)] xx 3`

∴ बहुलक = `square`

∴ वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक `square` आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×