Advertisements
Advertisements
Question
(कीर्ती कठीयाचा दृष्टान्त) पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
Solution
आमच्या परिसरातील शाळेचा दहावीचा निकाल उत्तम लागला. यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि पालक शिक्षकांचे आभारी होते. यातही श्री. अजिंक्य पाटील या शिक्षकांबद्दल विशेष आदर होता. ते भाषणासाठी उभे राहताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टांचे, रात्रंदिवस जागण्याचे, जेवणाची पर्वा न करण्याचे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्याचे वर्णन केले. बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले. त्यामुळे लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर ते म्हणाले, "मी नसतो तर विद्यार्थ्यांना हे यश मिळालेच नसते." यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. याचा अर्थ चांगला गुण असूनही उपयोग नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया जातो. या प्रसंगातून आपल्याला पाठातील तत्त्व शिकायला मिळते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
वानरेया - ______
काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
सर्वज्ञ - ______
काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
गोसावी - ______
आकृती पूर्ण करा.
प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
कठीया - ______
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
सी - ______
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
काइसीया - ______
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
कव्हणी - ______
‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.