English

माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.

Answer in Brief

Solution

 मी आता अकरावीत आहे. पण हा प्रसंग सांगत आहे, ता आहे मी नववीत असतानाचा. आम्ही पाच-सहा मित्र नेहमी एकमेकांच्या घरी अभ्यास करायला जमायचो. कधी या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. हसतखेळत आमचा अभ्यास चालायचा. त्या दिवशीचा प्रसंग मात्र मी आयुष्यभर विसरणार नाही.
एकदा आम्ही असेच आमच्या घरी अभ्यास करीत बसलो होतो. माझी आई स्वयंपाकघरात काम करीत होती. तेवढ्यात एक बाई आल्या. आल्या त्या घरातच घुसल्या. घसल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली.
"अहो, काय ऐकताय की नाही? तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? वर्ष उलटून गेलं. एक रुपया तुम्ही अजून परत केला नाही. व्याजावर व्याज चढत चाललं आहे. आणि तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? दुसऱ्याचे पैसे ठेवून तुम्हांला अन्न गोड कसं लागतं? अहो, माझ्यासारखीने तर जीव दिला असता! आम्ही उपाशी राहिलो असतो. पण दुसऱ्याचे पैसे आधी दिले असते. मगच दोन घास खाल्ले असते." त्या बाई असे काहीबाही बडबडून निघून गेल्या.
हे ऐकून मी हादरूनच गेलो. पुरता गांगरून गेलो. काय करावे ते मला कळना. आमची परिस्थिती गरिबीची होती, सतत कोणा ना कोणाकडून पैसे उसने घ्यावे लागत. सतत ओढाताण होई. पण आता मित्रासमार है असे घडल्यामुळे मला लाजिरवाणे वाटले. मला मित्रांकडे बघण्याचा धीर होईना. मी टेबलावर डोके टेकले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागल. तेवढ्यात माझा मित्र विवान जवळ आला. मला जवळ घेतले. तव्हा। मात्र माझा बांधच फुटला. तेवढ्यात माझी आई बाहेर आली. म्हणाला, "बाळांनो, तुम्ही आता घरी जा. तुमचा अभ्यास होणार नाही.
मित्र उठले. कष्टी मनाने बाहेर पडले. थोड्या वेळाने विवानची आई माझ्या घरी आली. तिने मला थोपटले. आत गेली. माझ्या आईची समजूत काढली. सगळी माहिती घेतली आणि गेली. संध्याकाळी माझ्या मित्रांचे आईबाबा आमच्या घरी जमले. त्या सगळ्यांनी मिळून आमचे सगळे कर्ज फेडायचे ठरवले होते. विवानची आई म्हणाली, "आपली ही मुलं गुणी आहेत. या सगळ्यांना आयुष्यभर एकमेकांचे मित्र म्हणून जगू द्या."

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.05: परिमळ - कृती [Page 24]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
Chapter 1.05 परिमळ
कृती | Q (४) (इ) | Page 24

RELATED QUESTIONS

प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


वैशिष्ट्ये लिहा.

दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.


'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.


टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
(१) डोळे  
(२) कान  
(३) नाक  
(४) त्वचा  

आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने


आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक


आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने


सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.

  1. मन:पटलावरील प्रतिमा
  2. 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी

'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:


______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

नाटक इतर साहित्यप्रकार
   
   

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन  

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाटकात संघर्ष असला तर  

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटक अनेक कलांचा संगम


स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×