English

म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.

Short Note

Solution

एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी, त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे. कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा-आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते. म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. ते पत्र खोटे असते. मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्शसुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. पण म्हातारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे; तरच मानवी समाजाला भविष्य आहे.

shaalaa.com
वाट पाहताना
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: वाट पाहताना - कृती [Page 30]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 8 वाट पाहताना
कृती | Q (५) (आ) | Page 30

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ______ 


कारणे शोधा.

पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ______ 


कारणे शोधा.

पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ______ 


तुलना करा. 

व्यक्तीशी मैत्री  कवितेशी मैत्री
______ ______
______ ______
______ ______
______ ______

‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्‌द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा. 

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे
     
     
     

पाठाच्या (वाट पाहताना) शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.


‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. एका शब्दात उत्तर लिहा.  (२)

  1. थंडी कमी होण्याची वेळ- ______
  2. लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना - ______

     होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर; पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हांला गॅलरीत झोपायला मिळायचं.
     रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले, की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, 'उद्या कोकिळेचं 'कुहू' ऐकू येईल का? बघू हं!' पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो 'कुहूऽकुहूऽ' आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं.
     सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!

२. वैशिष्ट्ये लिहा.  (२)

लेखिकेने अनुभवलेल्या सुट्टीचे वेगळपण

३. स्वमत कृती-  (३)

उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट तुम्ही पाहता का? कसे ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

      सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!
      आमच्या भल्यामोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली, तरी आख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. ते सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स!
      आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ्ठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची...

२) कारण लिहा.  (२)

  1. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण...
  2. उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं ...

३) स्वमत कृती-  (३)

पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं भेटतात; लेखिकेच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) तुलना करा.  (२)

व्यक्तीशी मैत्री कवितेशी मैत्री
   
   

 

      पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधीपण, केव्हापण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री-मध्यरात्रीसुद्धा; पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची.
     मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं-अस्वस्थ होणं-कशातच मन लागेनासं होणं-आई, आत्याची ती बोलणी खाणं! आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं.
     आमची आत्या तेव्हा उरुळीकांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरूळीला सहल जाण्याजोग वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच, गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ-साडेनऊसुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली, की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होत आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं; पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची.

२) ओघतक्ता तयार करा.  (२)

लेखिकेच्या आत्याच्या दररोजच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.

३) स्वमत -  (३)

तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या वाट पाहण्याचा तुम्हांला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×