Advertisements
Advertisements
Question
तुलना करा.
व्यक्तीशी मैत्री | कवितेशी मैत्री |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
Solution
व्यक्तीशी मैत्री |
कवितेशी मैत्री |
आपण त्या व्यक्तीला हाक मारतो. तिच्याकडे धावतो. मनसोक्त गप्पा मारतो. ती व्यक्ती प्रतिसादही देते. व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते. |
कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसे. मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटे. कविता मात्र खूप वाट पाहायला लावते. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा.
आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ______
कारणे शोधा.
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ______
कारणे शोधा.
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ______
कारणे शोधा.
पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ______
पाठाच्या (वाट पाहताना) शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.
‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. उत्तरे लिहा: (2)
- म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार - ______
- आपल्या तरुण मुलाला “माणसं' दाखवणारा - ______
शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवत आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो. |
2. आकृती पूर्ण करा. (2)
3. स्वमतः (3)
'वाट पाहणं' ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.