English

‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .....’ कल्पनाचित्र रेखाटा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .....’ कल्पनाचित्र रेखाटा.

Answer in Brief

Solution

जसजशी यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागली, तसतशी यंत्रमानवांची झपाट्याने निर्मिती होऊ लागली. तसेच यंत्रमानवांची मागणीही वाढली. लोकांना विविध कार्यासाठी रोबोट्सचा उपयोग करण्याची सवय लागली आणि त्यांची नेमणूक होऊ लागली. एवढच नाही तर, घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामे यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली. ज्यामुळे कामे जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण होऊ लागली.
परंतु, याचा एक विपरीत परिणामही दिसू लागला. मानवांची कामे कमी झाली आणि रिकाम्या वेळामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. लोक यंत्रमानवांचा उपयोग करून एकमेकांविरुद्ध कारस्थाने रचू लागले. यामुळे एक वेगळ्या प्रकारचे दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले. यंत्रमानवांमध्ये भांडण सुरू झाली. लोकांनी जमून यंत्रमानवांमधील संघर्ष आणि लढाईचा आनंद घेतला. चतुर व्यक्तींनी ही भांडणे सोडवण्यासाठी एक समर्थ यंत्रमानवांची समिती स्थापन केली. या सगळ्यामुळे एक विनोदी चित्र उभे राहिले. अशा प्रकारे, मनोरंजनाचा एक अनोखा मार्ग निर्माण झाला.

shaalaa.com
यंत्रांनी केलं बंड
  Is there an error in this question or solution?
Chapter 10.1: यंत्रांनी केलं बंड - स्वाध्याय [Page 40]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 10.1 यंत्रांनी केलं बंड
स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 40
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×