English

मुद्दे1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री2. प्रस्तुत कवितेचा विषय3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा.4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'अंकिला मी दास तुझा'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -
Chart

Solution

मुद्दे 'अंकिला मी दास तुझा'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री संत नामदेव
2. प्रस्तुत कवितेचा विषय परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. आगीच्या तडाख्यात सापडलेल्या बाळाला पाहून त्याची दयाळू आई त्याला वाचवण्यासाठी धाव घेते. (तसाच तू माझ्यासाठी धाव घेतोस).
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण 'अंकिला मी दास तुझा' हा अभंग मला फार आवडतो, कारण अभंगाची भाषा साधी-सरळ आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टान्त (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्त केला आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात 'बिंदूमध्ये सिंधू' म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच, ती वाचनीय, श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते.
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - काम
ii. सवें - लगेच
iii. पाडस - हरिणीचे पिल्लू
iv. धेनू - गाय
shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  Is there an error in this question or solution?
2019-2020 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

माता धावून जाते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

धरणीवर पक्षिणी झेपावते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

गाय हंबरत धावते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

हरिणी चिंतित होत ______.


आकृती पूर्ण करा.


कोण ते लिहा.

परमेश्वराचे दास -


कोण ते लिहा.

मेघाला विनवणी करणारा -


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.


पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 अ) आगीत पडणारे - ______ 

 ब) हुंबरत धावणारी - ______

अग्निमाजि पडे बाळू।

माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।

अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।

पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।

धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।

पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।

विनवितो चातक तैसा।।६।।

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. धरणी -

२. वन -

३. मेघ -

४. काजा -

४- काव्यसाैंदय

'तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।' या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)

  1. माता धावून जाते ______
  2. धरणीवर पक्षिणी झेपावते ______
  3. गाय हंबरत धावते ______
  4. हरिणी चिंतित होते ______

अग्निमाजि पडे बाळू।
माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।
पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।
पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा।।६।।

२. कोण ते लिहा. (२)

  1. परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
  2. मेघाची विनवणी करणारा - ______
  3. भुकेलेले - ______
  4. भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______

३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)

४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला -
(ii) कनवाळू -
(iii) माझिया -
(iv) वणवा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता -
(ii) कनवाळू -
(iii) काज -
(iv) धेनू -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×