Advertisements
Advertisements
Question
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
Solution
‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, वासरू-गाय, हरिणी-तिचे पाडस, चातक-मेघ अशा विविध दृष्टान्तांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे.
संत नामदेवांना विठ्ठल दर्शनाची, त्याच्या प्रेमप्रसादाची ओढ लागली आहे. परमेश्वराच्या प्राप्तीकरता त्यांचे मन व्याकुळ झाले आहे. या अभंगातून ते विठ्ठलभेटीची आपली तीव्र इच्छा व्यक्त करताना म्हणतात, ज्याप्रमाणे बाळ आगीच्या तावडीत सापडू नये, काही वाईट घडू नये, यासाठी बाळाच्या काळजीने आई धावत त्याच्यापाशी जाते, तसा भगवंता तू, माझ्यासाठी धावून येतोस. तुझ्या या प्रेमाने तू मला तुझा दास (सेवक) केले आहेस, मी तुला शरण आलो आहे. पिल्ले जमिनीवर पडताच आकाशात विहार करणारी पक्षीण लगेच त्यांच्याजवळ झेप घेते, भुकेल्या वासराच्या ओढीने गायही दूध पाजण्यासाठी हंबरत त्याच्याजवळ धाव घेते. रानात वणवा लागल्याचे समजताच हरिणी आपल्या पाडसाच्या काळजीने व्याकुळ होते, तीही आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांच्याजवळ धावत जाते. पावसाच्या थेंबांची वाट पाहणारा चातक ज्या आतुरतेने ढगांना पाऊस पाडण्याची विनंती करतो, त्याच आतुरतेने हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे.
अशाप्रकारे, संत नामदेव विविध उदाहरणांद्वारे परमेश्वराजवळ त्याच्या भेटीची, दर्शनाची विनवणी करत आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
धरणीवर पक्षिणी झेपावते ______.
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
गाय हंबरत धावते ______.
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
हरिणी चिंतित होत ______.
कोण ते लिहा.
परमेश्वराचे दास -
कोण ते लिहा.
मेघाला विनवणी करणारा -
आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'अंकिला मी दास तुझा' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)
- माता धावून जाते ______
- धरणीवर पक्षिणी झेपावते ______
- गाय हंबरत धावते ______
- हरिणी चिंतित होते ______
अग्निमाजि पडे बाळू। तैसा धांवें माझिया काजा। सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
२. कोण ते लिहा. (२)
- परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
- मेघाची विनवणी करणारा - ______
- भुकेलेले - ______
- भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______
३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)
४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘अंकिला मी दास तुझा’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) अंकिला - |
(ii) कनवाळू - | |
(iii) माझिया - | |
(iv) वणवा - |