Advertisements
Advertisements
Question
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
Solution 1
न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.
- घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन, या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
- वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.
- प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.
- खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.
Solution 2
न्यायालये ही भारतातील व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करतात. महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने पुढील निर्णय दिले आहेत.
१. महिला सक्षमीकरणासाठी, समाजात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी न्यायालयाने काही कायदे केले आहेत. उदा. हुंडा प्रतिबंधक कायदा हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली आहे.
२. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा देणारा कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा इत्यादी महत्त्वपूर्ण तरतुदी व निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा
७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.