Advertisements
Advertisements
Question
"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा.
तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा.
Short Answer
Solution
वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तरतीन मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर व चहापूड ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. यामुळे दरदिवशी सकाळ, संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?