Advertisements
Advertisements
Question
पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते?
Short Answer
Solution
पंडिता रमाबाईंनी, अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थनामंदिर (चर्च) बांधताना काटकसर करता यावी म्हणून स्वत:च त्याचा आराखडा तयार केला. प्रत्यक्ष बांधकामात डोक्यावरून विटांचे घमेले वाहून त्यांनी बांधकामालाही हातभार लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. अशाप्रकारे, प्रार्थनामंदिराच्या उभारणीच्या प्रसंगातून पंडिता रमाबाईंच्या व्यक्तिमत्वातील कष्टाळू व काटकसरी वृत्ती जाणवते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?