Advertisements
Advertisements
Question
'प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते', हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.
Solution
एखाद्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे आपल्याला त्या कामातील बारकावे लक्षात येतात. कामात एखादी चूक होत आहे हे लक्षात आल्यास ती दुरुस्त करता येते, हे मला प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. इयत्ता नववीत असताना आमच्या शाळेच्या वाङ्मय मंडळाने आमचे एक शिक्षक आणि आम्हां काही विद्यार्थ्यांवर शाळेच्या ग्रंथालयासाठी नवीन पुस्तके खरेदी करण्याची जबाबदारी सोपवली होती. आम्ही ग्रंथदानाच्या माध्यमातून लोकांकडून दान स्वरूपात पुस्तके मिळवली. प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्याशी इ-मेल, पत्रांद्वारे संपर्क साधून सवलतीच्या दरात पुस्तके देण्याची विनंती केली. झालेल्या खर्चाची व्यवस्थित नोंद ठेवली. पुस्तकांची खरेदी पूर्ण झाल्यावर सर्व पुस्तकांचे विषयांनुसार वर्गीकरण केले. संगणकादवारे त्यांची नोंदणी केली. अशाप्रकारे, या साऱ्या उपक्रमांतून आम्ही वेळेचे नियोजन, कामाचे व्यवस्थापन, हिशोब, पत्रलेखन अशा साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकलो. या सर्व गोष्टी स्वत: करता करता शिकल्यामुळे अतिशय चांगल्या समजल्या व लक्षातही राहिल्या.