Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे?
Solution
अनेक माणसे विविध जनुकीय आजारांची वाहक असतात, जसे की दात्रपेशी पांडुरोग, थॅलॅसिमिया, विविध संलक्षण विकृती. जर आई आणि वडील दोघेही अशा आजारांचे वाहक असतील, तर होणारी संतती त्या रोगाची शिकार बनू शकते. आपल्या अपत्याला होणारे रोग किंवा विकृती अगोदरच माहीत असल्यास, भविष्यातील त्रास टाळता येऊ शकतो. तसेच, एड्ससारख्या रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी भावी जोडीदाराच्या रक्ततपासणीचा आग्रह धरला पाहिजे. रक्तगटामुळे येणारी अजून एक समस्या म्हणजे एटीथ्रोब्लास्टोसीस फिटॅलीस, जो आई आर. एच. निगेटिव्ह आणि वडील आर. एच. पॉझीटिव्ह असतील तर तर त्यांना होणाऱ्या मुलांत खूप गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? स्पष्ट करा.
थोडक्यात माहिती लिहा.
डाऊन्स सिंड्रोम / मंगोलिकता
थोडक्यात माहिती लिहा.
एकजनुकीय विकृती
थोडक्यात माहिती लिहा.
सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना
अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे?
अ | ब | क |
लेबेरची आनुवंशिक चेताविकृती | 44 + xxy | निस्तेज त्वचा, पांढरे केस |
मधुमेह | 45 + x | पुरुष प्रजननक्षम नसतात. |
वर्णकहीनता | तंतूकणिका विकृती | स्त्रिया प्रजननक्षम नसतात. |
टर्नर सिंड्रोम | बहुघटकीय विकृती | भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होत. |
क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम | एकजनुकीय विकृती | रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम |
सहसंबंध लिहा.
44 + X : टर्नर सिंड्रोम : : 44 + XXY : ______
सहसंबंध लिहा.
स्त्रिया : टर्नर सिंड्रोम : : पुरूष : ______
आनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघतक्ता तयार करा.