Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
NCERT ची स्थापना करण्यात आली.
Answer in Brief
Solution
- 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग संस्थेची स्थापना करण्यात आली.
- केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
- शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT कडे सोपवण्यात आली.
- या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली.
- राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भांत सहकार्य व मार्गदर्शन NCERT ने उपलब्ध करून दिले.
- शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले.
shaalaa.com
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)
Is there an error in this question or solution?