Advertisements
Advertisements
Question
रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
रेडिओ दुर्बिणींचा वापर अवकाशातून येणाऱ्या रेडिओ लहरी पाहण्यासाठी केला जातो. रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या (Paraboloid आकार) डिश पासून अथवा अशा अनेक डिशच्या संचापासून बनलेली असते. दृश्य-प्रकाश दुर्बीणी प्रमाणेच या डिशच्या वक्रपृष्ठभागावरून रेडीओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभी केंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. तेथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र (Receiver) बसवलेले असते. यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक या माहितीचे विश्लेषण करून या रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो.
shaalaa.com
दुर्बिणीचे प्रकार: रेडीओ दुर्बीण
Is there an error in this question or solution?