English

दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात?

Answer in Brief

Solution

  1. अवकाशातून दृश्य प्रकाश वातावरणातून प्रवास करून पृथ्वीतलावर पोहोचतो.
  2. या प्रवासादरम्यान या प्रकाशाचे वातावरणात शोषण होते व आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते.
  3. दुसरी अडचण अशी की वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे वातावरणात खळबळ होत असेल तर त्यातून येणारे दृश्यप्रकाश किरण स्थिर राहात नाहीत.
  4. एवढेच नाही, तर दिवसा सूर्यप्रकाश असल्याने दृश्य प्रकाश दुर्बिणीचा वापर आपण करू शकत नाही.
  5. ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या गोष्टी सुद्धा आकाश निरीक्षणात अडथळा आणतात.
  6. या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात.
shaalaa.com
दुर्बिणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी - स्वाध्याय [Page 214]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 18 अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
स्वाध्याय | Q 6. इ. | Page 214
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×