Advertisements
Advertisements
Question
आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा.
अ. चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे?
आ. दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे दया.
इ. दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे.
ई. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे?
उ. वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते?
Solution
अ. चित्रात दाखवलेली दुर्बीण ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे.
आ.
इ. या न्यूटन पद्धतीच्या दुर्बिणीत अंतर्वक्र आरसा व सपाट आरसा यांचा वापर केलेला आहे.
ई. अंतवंक्र आरशावर आधारित दुसरी दुर्बीण म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण होय.
उ. न्यूटन पद्धतीत अवकाशातून येणारे प्रकाशकिरण अंतर्वक्र आरशावरून परावर्तीत होतात.हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे हे किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. तेथे असलेल्या ‘नेत्रिका’ नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित प्रतिमा पाहू शकतो.