Advertisements
Advertisements
Question
अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे. त्याची रेखाकृती काढा.
Answer in Brief
Diagram
Solution
अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून परावर्तित प्रकारच्या दुर्बिणी बनवता येतात. अंतर्वक्र आरशांवर आधारित दुर्बिणींमध्ये न्यूटन पद्धतीची व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण प्रचलित आहे.
- न्यूटन पद्धतीची दुर्बीण - न्यूटन पद्धतीत अवकाशातून येणारे प्रकाशकिरण अंतर्वक्र आरशावरून परावर्तीत होतात. हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एकसपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे हे किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. तेथे असलेल्या ‘नेत्रिका’ नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित प्रतिमा पाहू शकतो.
न्यूटन पद्धतीची दुर्बीण - कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण - कॅसेग्रेन पद्धतीतही अंतर्वक्र आरसाच वापरलेला असतो. मात्र इथे अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेले किरण एका बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वक्र आरशाकडेच परावर्तित होतात वअंतर्वक्र आरशाला त्याच्या केंद्रापाशी असलेल्या छिद्राद्वारे पलीकडे जाऊन नेत्रिकेवर पडतात. नेत्रीकेच्या साहाय्याने आपण स्रोताची वर्धित प्रतिमा पाहू शकतो.
कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण
shaalaa.com
दुर्बिणी
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा.
अ. चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे?
आ. दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे दया.
इ. दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे.
ई. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे?
उ. वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते?
गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करा.
दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात?