Advertisements
Advertisements
Question
सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
Solution
पूर्वी गावगाडा होता आणि नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलला आणि शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉल आणि सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा, भुसार मालाची दुकाने बंद पडली. लोहाराचा भाता बंद पडला, कुंभाराचे चाक फिरणे थांबले आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कल्हईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली आणि आधुनिक समाजव्यवहारांमुळे माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलांविषयी कवीने सांगितले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोष्टक पूर्ण करा.
पूर्वीचे व्यवसाय | पूर्वीचे खेळ |
आकृती पूर्ण करा.
सकारण लिहा.
जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी | तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे |
तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.
‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा.
- बदल
- परिणाम
- तुमचे मत