Advertisements
Advertisements
Question
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
Solution
शब्दकोडे सोडवताना आपल्या भाषिक ज्ञानाचा कस लागतो. पर्यायाने, शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते हे मला पटते. शब्दकोडे सोडवताना आपल्याला नवनवीन शब्दांचे ज्ञान मिळते त्यामुळे शब्दसंपत्तीत भर पडते. यामुळे, आपला शब्दसंग्रह वृद्धिंगत होतो. शिवाय, शब्दकोड्यामुळे भाषेची गंमतही अनुभवता येते. एकाच शब्दाच्या अनेक अर्थछटा माहीत होतात. यामुळे, शब्दसंपदा वाढण्यास मदत होते. परिणामत: शब्दचातुर्य विकसित होते. एकूणच, यामुळे भाषा समृद्ध होते, शब्दांचे उत्तम ज्ञान असणे हे आजच्या युगात फार महत्त्वाचे असल्याने; शब्दकोडे हे भाषावृद्धीचे एक प्रभावी साधनच ठरते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
टीपा लिहा.
गेंड्याच्या सवयी
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
(१) | |||
(२) | × | ||
(३) | |||
(४) | × | ||
(५) |