Advertisements
Advertisements
Question
शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात?
Short Note
Solution
- प्रत्येक सजीवाच्या शरीरात निरनिराळ्या संस्था सतत समन्वयाने कार्य करीत असतात. मानवी शरीरात हा समन्वय अधिकच प्रगत असतो.
- पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत व बाहय अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांत असलेल्या समन्वयातून करीत असतात.
- पचन संस्था शोषलेले अन्नघटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साहाय्याने सतत कार्य करीत असते. त्याच्यासोबत श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो.
- प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांत ऑक्सिजनच्या साहाय्याने अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यांस लागणारी ऊर्जा मिळवली जाते.
- या सर्व संस्थांची कार्ये चेता संस्थेच्या साहाय्याने नियंत्रित असतात. या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो. त्याची वाढ व विकास होतो.
shaalaa.com
सजीव आणि जीवनप्रक्रिया (Living organism and life processes)
Is there an error in this question or solution?