English

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.

Answer in Brief

Solution

अर्धसूत्री विभाजनातील पूर्वावस्था बऱ्याच कालावधीकरिता चालू राहते. या अवस्थेच्या पाच उपअवस्था आहेत. त्या पुढीलप्रमाणे : तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती.

  1. तनुसूत्रता: या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते. त्यामुळे ती जाडसर आणि ठळक होऊ लागतात.
  2. युग्मसूत्रता: या अवस्थेत सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात. याचबरोबर अनुबंधन म्हणजेच सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात. या गुणसूत्रांत पारगती होण्यासाठी 'जटिल अनुबंध' तयार होतो. प्रत्येक गुणसूत्राचा बाहू आता विभाजित होतो, मात्र त्याचा गुणसूत्रबिंदू विभागला जात नाही. त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते.

  3. स्थूलसूत्रता: या अवस्थेत पारगतीची क्रिया पार पडते. सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते. त्यामुळे जनुकीय विचरण घडून येते.

  4. द्विसूत्रता: या अवस्थेत 'जटिल अनुबंध' उलगडले जातात. त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात. या अवस्थेत इंग्रजी X प्रमाणे गुणसूत्रे भासतात. त्यांना ‘कायझ्मा' असे म्हणतात.
  5. अपगती: ही पूर्वावस्था - I ची सर्वांत शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत कायझ्मा उलगडला जातो आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे वेगळी होतात. केंद्रकी आणि केंद्रकावरण हळूहळू नाहीसे होऊ लागते.
shaalaa.com
पेशीविभाजन : एक आवश्यक जीवनप्रक्रिया (Cell division: an essential life process)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 5. इ. | Page 21

RELATED QUESTIONS

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.


फरक स्पष्ट करा.

सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन


शास्त्रीय कारण लिहा.

पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.


आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.


सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.


प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.


खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.


आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×