English

समाजातला वाढता हिंसाचार मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर कशाप्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

समाजातला वाढता हिंसाचार मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर कशाप्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील?

Answer in Brief

Solution

समाजातल्या हिंसाचार वाढू नये, म्हणून खालीलप्रमाणे प्रत्येक पातळीवर शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील.

  1. वैयक्तिक पातळी: समाजाचा एक घटक म्हणून समाजात कोणत्याही प्रकारे अराजकता निर्माण होणार नाही यासाठी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नैतिकता व मूल्यांच्या जोपासनेसाठी प्रयत्न करावेत. उदा. व्यक्तीने समाजातील इतरांविषयक संवेदनशीलता बाळगावी, तसेच चुकीच्या कृत्याला पाठिंबा न देता योग्य गोष्टींसाठी प्रयत्न करावेत. समाजाची शांतता भंग करणाऱ्या गोष्टींविरोधात त्वरित आवाज उठवावा.
  2. कौटुंबिक पातळी: कुटुंबातील प्रत्येकानेच मोबाइल, संगणक यांवर हिंसक खेळ खेळणे टाळावे, कारण हे खेळ सातत्याने खेळल्याने व्यक्तीमध्ये हिंसकवृत्ती विकसित होऊ शकते, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी घरातील मुलामध्ये साहस आणि सर्जनशील खेळांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
  3. सामाजिक पातळी: सर्वप्रथम आपले शेजारी आणि परिसरातील लोक यांच्याशी शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. समाजात होत असलेल्या हिंसाचाराला विरोध करून एकसंघ समाजाच्या निर्मितीसाठी चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन गट तयार करावेत. या गटांच्यामार्फत हिंसाचाराचे दुष्परिणाम सांगणारे पथनाट्य जनजागृती कार्यक्रम सादर करावेत आणि लोकांना हिंसाचारापासून परावृत्त करावे.
  4. शासकीय पातळी: शासकीय स्तरावरदेखील हिंसाचारापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी प्रसार माध्यमांच्या साहाय्याने जनजागृती कार्यक्रम राबवले जातात, तसेच 'तंटामुक्त गाव' यासारख्या मोहिमा राबवून त्या त्या गावांचा सत्कार केला जातो.
shaalaa.com
मानवी सुरक्षा
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - पाठयअंतर्गत प्रश्न [Page 75]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
पाठयअंतर्गत प्रश्न | Q ७. | Page 75
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×