English

मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न करता येतील? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न करता येतील?

Answer in Brief

Solution

मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.

  1. कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देऊन विकासाची संधी देता येईल. यातून आर्थिक सुरक्षितता साधता येईल.
  2. तसेच, सर्वांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देता येतील.
  3. कुटुंबामध्ये धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करता येईल.
  4. शिवाय, आपले पर्यावरण दूषित होऊ नये व आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्याच्या चांगल्या सवयी व परिसर स्वच्छतेची सवय लावता येईल.
  5. समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव कुटुंबामध्ये निर्माण करता येईल.
  6. आपल्या शेजारील कुटुंबाशी सलोख्याचे नाते निर्माण करून कुटुंबामध्ये शांततामय सहजीवनाचे मूल्य रुजवता येईल.
    अशारितीने, प्रयत्न केल्यास निश्‍चितपणे अनेक कुटुंब एकत्र येऊन तयार झालेल्या समाजातही शांतातमय व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल.
shaalaa.com
मानवी सुरक्षा
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - पाठयअंतर्गत प्रश्न [Page 75]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
पाठयअंतर्गत प्रश्न | Q ६. | Page 75
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×