Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न करता येतील?
थोडक्यात उत्तर
उत्तर
मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.
- कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देऊन विकासाची संधी देता येईल. यातून आर्थिक सुरक्षितता साधता येईल.
- तसेच, सर्वांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देता येतील.
- कुटुंबामध्ये धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करता येईल.
- शिवाय, आपले पर्यावरण दूषित होऊ नये व आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्याच्या चांगल्या सवयी व परिसर स्वच्छतेची सवय लावता येईल.
- समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव कुटुंबामध्ये निर्माण करता येईल.
- आपल्या शेजारील कुटुंबाशी सलोख्याचे नाते निर्माण करून कुटुंबामध्ये शांततामय सहजीवनाचे मूल्य रुजवता येईल.
अशारितीने, प्रयत्न केल्यास निश्चितपणे अनेक कुटुंब एकत्र येऊन तयार झालेल्या समाजातही शांतातमय व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल.
shaalaa.com
मानवी सुरक्षा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी सुरक्षा
मानवी सुरक्षा म्हणजे काय?
मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे तुम्हांला वाटते का? चर्चेत तुम्ही कोणते मुद्दे मांडाल?
समाजातला वाढता हिंसाचार मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर कशाप्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील?