Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी सुरक्षा
उत्तर
राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते.
म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.
निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी सुरक्षा म्हणजे काय?
मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे तुम्हांला वाटते का? चर्चेत तुम्ही कोणते मुद्दे मांडाल?
मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न करता येतील?
समाजातला वाढता हिंसाचार मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर कशाप्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील?