Advertisements
Advertisements
Question
सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणांसह स्पष्ट करा.
Solution
(१) अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय याने सॉफ्ट पॉवर (Soft power) ही संकल्पना प्रतिपादित केली आहे.
(२) सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते.
(३) सॉफ्ट पॉवरमध्ये सक्तीच्या ऐवजी आकर्षण निर्माण करून आपली उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असणे.
(४) अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
(अ) शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकेत अन्य देशांतून बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेत स्थायिक होतात. त्याद्वारा अमेरिकेत उच्चशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध होतात.
(ब) आंतरजालच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उदारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांचा प्रसार जगभर झाला आहे.
(क) मॅकडोनाल्ड, सबवे, पिझाहट, बर्गर किंग इत्यादी फूड चेन्स द्वारा अमेरिकन खाद्य संस्कृतीचा जगभर प्रसार झाला आहे.