English

युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. (अ) इतिहास (ब) युरोपियन आयोग (क) युरोपियन संसद (ड) युरोपियन परिषद (इ) युरोपियन न्यायालय - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.

(अ) इतिहास 

(ब) युरोपियन आयोग 

(क) युरोपियन संसद 

(ड) युरोपियन परिषद 

(इ) युरोपियन न्यायालय

Answer in Brief

Solution

युरोपियन महासंघ European Union चे विवरण पुढीलप्रमाणे आहे:
(इतिहास: दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांनी आर्थिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सन १९५१ मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय सन १९५७ मध्ये युरोपीय आर्थिक समुदाय आणि सन १९५८ मध्ये युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन केल्या. या संघटना एकमेकांत विलीन होऊन युरोपीय बाजारपेठेची आणि मीस्त्राक्त कराराद्वारा सन १९९२ मध्ये युरोपीय महासंघाची स्थापना झाली.
(युरोपियन आयोग: युरोपियन आयोग ही महासंघाची नोकरशाही-कार्यकारी यंत्रणा आहे. हा आयोग युरोपियन संसदेत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करतो. तसेच युरोपियन संसदेला कायदे करण्यासाठी प्रस्ताव सुचवतो.
(युरोपियन संसद: प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा सदस्य देश संसदेच्या ७५१ सदस्यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड करतात. संसद कायदेविषयक देखरेख आणि अर्थविषयक कार्ये पार पाडते.
(युरोपियन परिषद: महासंघाच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचा समावेश होतो. परिषदेच्या पूर्णवेळ अध्यक्षाची निवड केली जाते. परिषदेच्या वर्षातून चार सभा आयोजिक केल्या जातात. ही संघटना युरोपीय युनियनला सामाजिक नेतृत्व प्रदान करते.
(युरोपियन न्यायालय: युरोपियन युनियनमधील कायद्याचे व करारांचे अर्थ लावणे आणि त्यांच्या आधारे सदस्य देशांतील वादांचा निवाडा करणे ही जबाबदारी युरोपियन न्यायालय पार पाडते. युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कारयद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात.

shaalaa.com
शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: १९९१ नंतरचे जग - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1 १९९१ नंतरचे जग
स्वाध्याय | Q ६ | Page 13

RELATED QUESTIONS

पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.

२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा. 


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.


आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.


खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. 

 आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट


खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
  2. युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

सार्कची सदस्य राष्ट्रे:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×