Advertisements
Advertisements
Question
स्पष्ट करा.
हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत.
Answer in Brief
Solution
- स्फटिक रूपातील पदार्थाच्या अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते.
- चतुष्कोनातील त्रिमितीय रचना तयार करण्याकरता हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बंधित असतो, म्हणून हिऱ्यात अणूंची नियमित व निश्चित रचना आढळते.
- ग्रॅफाइटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशाप्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्रॅफाइटमधील ही अणूंची रचनाही नियमित व निश्चित असते.
- फुलरीनमध्ये, C60 अणू पंचकोनी आणि षटकोनी व्यवस्थांमध्ये एकमेकांशी जोडलेले असतात. परिणामी, फुलरीनची रचना फुटबॉलसारखी असते. फुलरिनचे रेणू बकीबॉल्स (गोलाकार), बकीट्यूब्ज्या (दंडगोलाकार) स्वरूपात आढळतात.
- हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन अशा पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असल्याने ते स्फटिकासारखे असतात. म्हणूनच हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे
Is there an error in this question or solution?