Advertisements
Advertisements
Question
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा.
स्टार कंपनी लिमिटेड ने अलिकडेच एफ.पी.ओ. द्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे. मागणी केलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे. संचालक मंडळ भाग वाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे. कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या: |
(अ) कंपनीने भाग वाटप समिती नियुक्त करावी का?
(ब) ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप झाले/केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे?
(क) किती कालावधीत कंपनीने भाग प्रमाणपत्र दयावे?
Case Study
Solution
(अ) होय, कंपनीने वाटप समिती स्थापन करावी. वाटप समिती वाटपाचा आधार ठरवेल आणि त्याचा अहवाल मंडळाला सादर करेल.
(ब) कंपनीला ज्या अर्जदारांना भागांचे वाटप करायचे आहेत त्यांना वाटप पत्र किंवा वाटप सल्ला जारी करून माहिती द्यावी.
(क) कंपनीने भागांच्या वाटपाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्रे जारी करावी.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?