Advertisements
Advertisements
Question
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
Solution
सुगरण पक्ष्याप्रमाणे जर माझ्यात चिकाटी असेल, तर मी माझे अक्षर चिकाटीने सुधारेन. सगळे पाढे तोंडपाठ करेन. अवघड गणिते नीट सोडवेन. माझे कपड्यांचे आणि खेळण्यांचे कपाट नेहमी नीटनेटके लावून ठेवेन. आईला कोथिंबीर, भाजी निवडायला मदत करेन. मला एखादी गोष्ट करायला जमत नसेल, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करेन.
RELATED QUESTIONS
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
(आ) पैंजण | (२) खडखड |
(इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
(ई) बैलगाडी | (४) खळखळ |
(उ) पाणी | (५) छुमछुम |
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?
पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत | (१) वक्ता |
(आ) धावण्यात पटाईत | (२) क्रिकेटपटू |
(इ) भाषण करण्यात पटाईत | (३) धावपटू |
"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
सांगा पाहू.
शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |