Advertisements
Advertisements
Question
सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.
Solution
सूर्य हा प्रकाश आणि उष्णता ऊर्जेचा प्रमुख नैसर्गिक स्रोत आहे. सातत्याने आपल्या ऊर्जेने तो संपूर्ण पृथ्वीला सहकार्य करत असतो. येथील प्रत्येक जिवाचे अस्तित्व टिकून राहण्यात या सूर्याच्या ऊर्जेचा प्रमुख वाटा आहे. मनुष्य आणि इतर सजीव सृष्टी सूर्याच्या प्रकाश व उष्णतेविना उद्ध्वस्त होईल, दुरावस्थेत जाईल याची सूर्यास कल्पना आहे. हा सूर्य प्रस्तुत कवितेमध्ये कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटतो. ज्याप्रमाणे साऱ्या कुटुंबाच्या ऊर्जेचा स्रोत हा कुटुंबप्रमुख असतो त्याचप्रमाणे पृथ्वीरूपी कुटुंबाचा सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. तोच या चराचरांत प्राण फुंकतो. सूर्य नसेल, तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत सुरू राहणे केवळ अशक्यच आहे, याची जाणीव असलेल्या सूर्याला, महान ऊर्जास्रोताला आपल्या अस्तानंतर पृथ्वीचे काय होईल याची चिंता वाटणे साहजिकच आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
पणतीच्या उदाहरणातून 'जाता अस्ताला' कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावनांचे वर्णन शब्दबद्ध करा.
'जाता अस्ताला' कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.
प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.