Advertisements
Advertisements
Question
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावनांचे वर्णन शब्दबद्ध करा.
Solution
सूर्य उगवतो तेव्हा मानवी जग चैतन्याने रसरसते. मानवाचे जीवन फुलते. मनात कार्य करण्याची इच्छा जागृत होते. दिवसभर सूर्यप्रकाशात मानवी मन उजळत राहते. परंतु सूर्यास्त होताच मानवी मन कृतार्थतेने भरून येते. घरी परतण्याची व कुटुंबात रमण्याची ओढ निर्माण होते. पण त्याच बरोबर दिवस मावळतोय याची मंदशी उदासी मनात रेंगाळत राहते. मन काहीसे हळवे होते. कातर होते. प्रियजनांच्या भेटीची हरहर मनात दाटून येते. सूर्यास्ताच्या वेळचा तेजोगोल मानवी जगाचा निरोप घेतो नि माणूसही सूर्याला आर्त निरोप देतो. परंतु पुन्हा उद्या सूर्यदर्शन होणार ही आशा मानवीमनात पल्लवीत होतच राहते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
पणतीच्या उदाहरणातून 'जाता अस्ताला' कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
'जाता अस्ताला' कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.
कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.
प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.