Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत अाहात ते सकारण स्पष्ट करा.
Solution
भाषा आणि व्यंगचित्र ही दोन भिन्न माध्यमे आहेत. त्यांचे सादरीकरण भिन्न असते आणि त्यांचे परिणामही भिन्न असतात. आपण घर हा शब्द लिहितो, तेव्हा घर या शब्दाचा आकार पाहून किंवा घर या शब्दाच्या उच्चारातून जो ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी ऐकून घराचा बोध होऊ शकणार नाही. फक्त मराठी भाषा समजणाऱ्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. घर शब्दाच्या आकाराशी व उच्चाराशी घर ही वस्तू जोडलेली आहे. ज्याला हा संकेत माहीत आहे आणि ज्याने तो संकेत लक्षात ठेवला आहे, त्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. याउलट, घराचे चित्र दाखवल्यावर ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या वस्तूचा बोध होतो. तिथे भाषेची आडकाठी येत नाही. देशाच्या सीमा आड येत नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक दर्जाचा संबंध येत नाही. चित्रातून आशयाचे थेट आकलन होते. म्हणून भाषेपेक्षा चित्र आशयाला प्रेक्षकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते.
चित्र व व्यंगचित्र यांत काहीएक फरक आहे. व्यंगचित्रात काही व्यक्ती दाखवलेल्या असतात. व्यंगचित्रकार कधीही विषयवस्तूचे फक्त वर्णन करीत नाही. त्याला माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर काहीएक भाष्य करायचे आहे. त्या वृत्ती-प्रवृत्ती ठळकपणे लक्षात याव्यात म्हणून माणसांचे चेहेरे, त्यांवरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यांतील काही रेषा मुद्दाम ठळकपणे चितारतो. त्यामुळे चित्र हे व्यंगचित्र बनते. व्यंगचित्रातून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर केलेली टीका कोणालाही पटकन कळू शकते. तोच भाव समजावून सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात. खूप शब्द वापरूनही सर्व आशय नेमकेपणाने व्यक्त होतोच असे नाही. व्यंगचित्राच्या बाबतीत असे घडत नाही. तेथे आशय स्पष्टपणे लक्षात येतो.
व्यंगचित्रात चालू घडामोडींवर भाष्य असते. व्यंगचित्र पाहणारा प्रेक्षक चालू घडामोडींचा साक्षीदारही असतो. म्हणून त्याला व्यंगचित्र पटकन कळू शकते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा.
पाठातील गोष्टी |
प्रतीके |
(१) चिमुरड्या मुलीचं डोकं - |
|
(२) आई हे नातं - |
|
(३) भरपावसातली छत्री - |
वैशिष्ट्ये लिहा.
लेखकाच्या मते व्यंगचित्रांची वैशिष्ट
वैशिष्ट्ये लिहा.
व्यंगचित्राच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये
योग्य जोड्या लावा.
'अ' गट |
‘ब’ गट |
लेखकाचीव्यंगचित्रे |
व्यंगचित्रांचीकार्ये |
(१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर |
(अ) भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात. |
(२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही |
(आ) स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केल |
(३) शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना |
(इ) लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते. |
लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.
लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली.
लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती.
लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.
लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती.
लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता.
वर्णनकरा.
वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.
वर्णनकरा.
स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर
वर्णनकरा.
लेखकांनी रेखाटलेले आईचे काव्यात्म चित्र.
स्वमत.
'वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
अभिव्यक्ती.
'स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) दिलेल्था उताऱ्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा. (2)
(i)
(ii)
- आईचं नातं
- इतर नाती
अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रं ही नि:शब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते’. हे मी स्वत: अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीन चार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचताे म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं. व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रांमधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर दोन अक्षरं आहेत ‘बाबा’. पाऊस ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली इवलासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाही येत; पण तरीदेखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथे उभा आहे तो आत्ताच्या वयाचा पंचाहत्तरी पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्यामागे आत्तापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आलं आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही व्यक्त करू शकलो. |
(२) व्यंग हे भाषेपेक्षा संवादाचे माध्यम आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. (2)
(३) स्वमत अभिव्यक्ती- (4)
लेखकाने व्यंगचित्रातून वडिलांना कशाप्रकारे श्रद्धांजली वाहिली? हे स्पष्ट करा.
किंवा
व्यंगचित्राकार म्हणून ‘आई’ विषयी मांडलेली काव्यात्म कल्पना तुमच्या भाषेत लिहा.