Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या.
Solution
गेल्या वर्षींची गोष्ट, नववीचा निकाल लागण्यापूर्वी एके दिवशी वर्गात नोटीस आली. सरांनी ती आम्हां विदयार्थ्यांना वाचून दाखवली. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विदयार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. हे ऐकून सगळा वर्ग नाराज झाला. शांतता पसरली. मग हळूहळू कुजबूज सुरू झाली. कशाला बदलायचा? आहे तो अभ्यासक्रम किती छान आहे? हळूहळू मित्र/मैत्रिणी आपापसांत बोलू लागले. कुणीही या अचानक बदलाला तयार नव्हते. मलाही जरा आतून भीती वाटायला लागली. कसा असेल नवीन अभ्यासक्रम ? खूप कठीण तर नसेल ना ? असे प्रश्न माझ्या मनात घोळू लागले. त्या दिवशी रात्रभर त्या विचाराने झोप लागली नाही. रात्रभर मी विचार करीत राहिलो. पण मनात थोडी उत्सुकता ही होतीच. थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की बदल स्वीकारायला माणूस सहजासहजी तयार होत नाही... हेच खरे!
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा.
लेखक | निसर्ग |
(१) | (१) |
(२) | (२) |
पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल | उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
लेखकाच्या मते सप्तरंग म्हणजे काय, ते स्पष्ट करा
खालील आकृती पूर्ण करा.
स्वमत.
‘बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.