Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
मकबरा लेखकाच्या सुखदु:खांच्या क्षणांचा साक्षीदार आहे, हे विधान पाठाच्या आधारे पटवून द्या.
Solution
लेखकाला मकबऱ्याची आठवण दिवस-रात्र येत असते. लेखकाच्या जीवनातील हिवाळे, पावसाळे, उन्हाळे मकबऱ्याने पाहिले आहेत. अपूर्व काव्याच्या संपादनाचा अनुभव असो, की शिलालेखांच्या दस्तऐवजांचा अभ्यास असो, त्या एकांताच्या क्षणांत लेखकाच्या आनंदाला केवळ मकबऱ्याने प्रतिसाथ दिली आहे. मकबऱ्याच्या लेखकावरच्या प्रेमाच्या दृष्टीला लेखकाच्या जीवनात फार मोलाचे स्थान आहे. लेखकाच्या सुखदु:खाचा तो भागीदार आहे. लेखकाच्या जीवनाचा मकबरा एक अतूट भाग असल्यामुळे मकबरा लेखकाच्या सुखदुःखाच्या क्षणांचा साक्षीदार आहे, असे म्हणता येते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) मिनार | (१) वाट पाहतो. |
(आ) घुमट | (२) साद घालत असते. |
(इ) बारादरी | (३) आसुसलेले असतात. |
एका शब्दात उत्तर लिहा.
चोंभा कवीचा काव्यसंग्रह
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा संतसाहित्यावरील ग्रंथ
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाला मिळालेली पदवी
एका शब्दात उत्तर लिहा.
मकबऱ्याचे नाव
स्वमत.
‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- काचेच्या खिडकीतून लेखकाकडे टक लावून पाहणारा - _______
- लेखकाच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाचे नाव - _______
माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट. मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, ‘संतसाहित्यचिंतना’ सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. माझ्या आयुष्यात या स्नेहाळ क्षणांना फार फार मोलाचं स्थान आहे. हे सारे क्षण मी माझ्या हृदयात खोल खोल जपून ठेवले आहेत, दडवून ठेवले आहेत. |
(2) आकृती पूर्ण करा: (2)
(3) जोड्या लावा. (2)
'अ' गट | 'ब' गट |
(i) मिस्किलपणे हसणारे | (1) मकबरा |
(ii) तरारून येणारे | (2) मिनार |
(3) घुमट |