Advertisements
Advertisements
Question
स्वमत स्पष्ट करा.
‘आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
Solution
मेंदूने सर्व अवयवांना उद्देशून म्हटलेले हे विधान अतिशय समर्पक आहे. शरीर ही विविध अवयवांनी मिळून बनलेली रचना आहे. त्यातील प्रत्येक अवयव आपली काही वैशिष्ट्ये, जबाबदाऱ्या धारण करून असतो. त्यानुसार त्या - त्या अवयवांचे कार्य सुरू असते. त्यातील एकाही अवयवाचे कार्य बिघडले असता त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण शरीरावर होतो, म्हणून प्रत्येक अवयवाने स्वत:चे नियोजित कार्य सातत्याने, न कंटाळता करणे हे शरीराच्या दृष्टीने हिताचे असते. जर जीवनचक्र सुरळीत चालू ठेवायचे असेल, तर प्रत्येक अवयवाने आपली सेवा सतत चालू ठेवणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे एखाद्या राज्याच्या सुव्यवस्थेकरता नागरिकांमध्ये एकी असणे व प्रत्येकाने आपले काम चोख करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे सर्व अवयवांनीही एकत्र येऊन काम करणे गरजेचे असते, म्हणूनच हे सर्व अवयव या शरीररूपी राज्याला तारणारे, त्याची सेवा करून त्याला जपणारे सेवक आहेत.
RELATED QUESTIONS
एका शब्दात उत्तरे लिहा.
वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी -
एका शब्दात उत्तरे लिहा.
अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते-
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
हात-
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
↓ |
______ |
↓ |
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
↓ |
______ |
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.